सेलूत तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा

0 108

 

नारायण पाटील
सेलू,दि 06
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतीमाला योग्य भाव द्यावा, गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात शनिवार ६ रोजी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. दरम्यान, मोर्चातील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. नूतन रोड मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, राम पाटील, पुरूषोत्तम पावडे, नामदेव डख, पवन आडळकर, सुधाकर रोकडे,रणजीत गजमल,निर्मला लिपणे,गोरख भालेराव,प्रकाश मूळे,सूधाकर पवार,व्हि.पी.राठोड,अँड.
बालासाहेब रोडगे,रमेश डख,बाळासाहेब भांबळे,मूलरीधर मते,रामेश्वर पौळ,दत्तूसिंग ठाकूर,माजीद बागवान,पप्पू गाडेकर,विठ्ठल काळबांडे,आप्पासाहेब रोडगे,जिवन आवटे,विशाल देशमूख,शिवराज कदम आदींची उपस्थिती होती.
शेतीमाला भाव मिळत नाही. शेतकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करत आहेत.पीक विमा भरून संबंधित कंपनी नुकसान भरपाई देत नाही, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही,पीक चांगले आले तर वन्य प्राण्यांकडून नासाडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त आहे,सर्व महामंडळाना निधी उपलब्ध करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत,संजय गांधी निराधार,श्रावण बाळ आदी योजनांची प्रकरणे मंजूर करावीत आदी मागण्यासाठी या आक्रोश मोर्चा काढून निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत शासनास देण्यात आले .यावेळी शेतकरी,शेतमजूर आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थीती होती.

error: Content is protected !!