शेतकऱ्याच्या मुलाची सी ए परीक्षेत गरूड झेप
सेलू ( नारायण पाटील )
शहरात राहणारी व उच्चशिक्षित कुटूंबातील मुलेच सी ए परीक्षेत यशस्वी होतात असा सर्वत्र गैरसमज आहे .व हा गैरसमज तालुक्यातील सोन्ना येथील शेतीनिष्ठ शेतकरी तथा वारकरी सांप्रदायाचा वारसा व परंपरा लाभलेले श्री दत्तराव सखरामजी मगर यांचे चिरंजीव सोमदत्त मगर यांनी खोटा करून दाखवला आहे .प्रबळ इच्छाशक्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंन्टन्सी (C.A.) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
सोमदत्त मगर यांना अरविंद निर्मळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सोमदत्त चे माध्यमिक शिक्षण येथील न्यू हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण नूतन महाविद्यालयात झालेले आहे.त्यांच्या यशाबद्दल श्री पांडुरंगराव मगर,गोविंदभाऊ जोशी,श्रीबल्लभजी लोया,मोकिंदराव झोडगावकर,संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे,संजय मगर, सुनिल डख,प्रा.विनायक मगर, प्रा.डीगांबर मगर, शरद मगर, राजेभाऊ मगर,संजय वाघ, भरत रोडगे,न्यू हायस्कूल परिवार व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सोन्ना सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी व वारकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरीरयांच्या विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.सोमदत्त च्या आई-वडीलांचा शेती व्यवसाय तर आहेच परंतु मगर परिवाराला वारकरी संप्रदायाचा देखील मोठा वारसा लाभलेला आहे, मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर च्या आषाढी एकादशी च्या पायी दिंडी(१११) चे नेतृत्व हभप दत्तराव महाराज सोन्नेकर करतात. पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे कुटुंब म्हणून मगर परिवार पंचक्रोशीतील सर्व परिचीत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.