पूर्णेत महावितरणचे फ्युज काॅल सेंटर कर्मचारीच ठेवतात बंद
पूर्णा:( सुशिलकुमार दळवी)
विज सेवा खंडित झाल्यास स्थानिक ग्राहकांना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला जावा यासाठी महावितरणने आपल्या प्रत्येक कार्यालयात एका फ्युजकाॅल नंबरची सेवा सुरू केली आहे.पूर्णा शहरात बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे या सेवेचा बोजवारा उडाला असून सतत हा नंबर बंद राहत असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी संपर्क करावा तरी कोणाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पूर्णा शहरातील महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या माता मंदिर सब स्टेशनला पुरवठा होणारा महावितरणचा केबल रेल्वे लाईनखाली तांत्रिक बिघाड होऊन जळाला होता.यामुळे २८ तास विज गुल झाली होती.त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करत बसस्थानक फिडरवर शहराचा विद्युत पुरवठा सुरू केला.बिघाड झालेले केबल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. माागील काही दिवसांपासून शहरातील विद्युत पुरवठा वारंवार रात्री अपरात्री सतत खंडित होत आहे.यामुळे शहरातील विद्युत ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत.खंडीत झालेली वीज दोन दोन तास गुल राहत असल्याने ग्राहक फ्युज काॅल नंबरवर संपर्क करत आहेत.परंतु सदरील ड्युटीवर तैनात असलेले कर्मचारी नंबर सतत बंद ठेवत आहेत तर कीतीही वेळा संपर्क केला तर तो काॅल उचलत नाहीत.दरम्यान गुरुवारी १ जुन रोजी सायं सुमारास पासून ते मध्यरात्री पर्यंत चार ते पाच वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला.दरम्यान ड्युटीवर तैनात असलेले इफ्तिकार, हे कर्मचारी यांनी महावितरणचा फ्युज काॅल नंबर बंद ठेवल्याने काही जागरुक नागरिकांनी सदरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला परंतु वारंवार संपर्क करुन ही सदरील कर्मचाऱ्यांनी फोन घेतला नाही.विज कधी येणार कुठली वीज बंद पडली हे सांगण्यासाठी ग्राहकांना मात्र याचा नाहक त्रास सोसावा लागला.शहरात मात्र निवासी कार्यकारी अभियंता व शहर सहाय्यक अभियंता पंडित राठोड हेडकॉटरला राहतात बाकी कर्मचारी अपडाऊन करतात.
काही नागरीकांनी याबाबत उप कार्यकारी अभियंता खोडपे, व शहर अभियंता पंडित राठोड यांना संपर्क साधून संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.