आजोबाची रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नातवाचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू.

0 267

नारायण पाटील
सेलू,दि 08 ः
आजोबाचा रक्षा सावडणच्या कार्यक्रमानंतर रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गेलेल्या ३३ वर्षीय नातवाचा गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.८) सकाळी घडली.या घटनेमुळे वालूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वालूर (ता.सेलू) येथील भिकूदेव नागूदेव पाठक (वय ९३ वर्ष) यांचे
वृद्धापकाळाने सोमवारी(दि.७) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी सकाळी वालूर-बोरी रस्त्यावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी (दि.८) सकाळी त्यांचा रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून रक्षा विसर्जन करण्यासाठी नातू सुचीत मारोती पाठक (वय ३३ वर्ष) हा ईतर नातेवाईकासोबत रामपुरी (ता.सेलू) गावाजवळील गोदावरी नदीच्या घाटावर गेले होते.रक्षा विसर्जन करताना सुचीत पाठक यास नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात डाॅ.संकेत आल्डे यांनी उत्तरीय तपासणी केली.
सुचीत पाठक हे मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या कार्यालयात सेवेत होते.त्यांच्या पश्चात आजी, वडील,पत्नी,एक भाऊ,एक तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
सुचीत पाठकच्या मृत्यूमुळे वालूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!