संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे थाटात उदघाटन

एनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनाने श्रोते मंत्रमुग्ध

0 112

 

 

सेलू / नारायण पाटील –सेलूत होणाऱ्या दोन दिवसीय सेलूभुषण कै.हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उदघाटन आज दि ३० रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले .

 

यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ.विनायकराव कोठेकर, शेतकरी संघटनेचे नेते गोविंदभाऊ जोशी,डॉ.रामराव रोडगे,माजी सभापती अशोकराव काकडे,संतोष कुलकर्णी,माजी प्राचार्य शरद कुलकर्णी, यशवंतराव चारठाणकर,उद्योजक महेश खारकर,मोहन खापरखुंटीकर,अजित मंडलिक, श्रीकांत उमरीकर,मल्हारीकांत देशमुख यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते कै. हरिभाऊ काकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.

 

प्रारंभी जेष्ठकवी गौतम सुर्यवंशी लिखित तर शांतीभुषण चारठाणकर यांनी स्वरबद्ध केलेले “सूर ज्यांचा श्वास होतो,संगीताची साधना” स्वागतगीत श्रृती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीवृंदाने सादर केले. संगीत संमेलनाची सुरूवात ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनाने झाली.यावेळी बासरी ची साथ श्रीनिवास लंकावाड व अनहद वारसी यांनी दिली तर तबला साथ गजानन धुमाळ यांनी दिली .

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.

error: Content is protected !!