सेलू न्यायालयात आरोग्य शिबीर संपन्न

0 56

 

सेलू / प्रतिनिधी – जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी व उप जिल्हा रुग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमावार व सेलूचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्धन गोळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका न्यायालय सेलू येथे दि ५ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते .

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्री अरुण कुलकर्णी व सह दिवाणी न्यायाधीश श्री मंदार राऊत हे होते तर अध्यक्ष वकील संघ श्री रामेश्वर शेवाळे सहाय्यक अधीक्षक श्री भास्कर समिंदरे लघुलेखक विजय बारगाजे वरिष्ठ लिपिक श्री गणेश कदम शिपाई गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती .

 

आरोग्य शिबिर मध्ये सर्व न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व वकील मंडळी यांची उच्च रक्तदाब ,मधुमेह , HIV ECG लिपिड प्रोफाइल किडनी ची तपासणी लीव्हर टेस्ट व विविध रक्त तपासणी करण्यात आल्या.

 

या कार्यक्रमासाठी उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्व तपासण्या व समुपदेशन केले .
या शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चव्हाण डॉ.बुरेवर सर,डॉ श्रीमती आरती गवई श्रीमती सविता डुमाने श्री विकास चव्हाण डॉक्टर गणेश मुळे डॉ मालानी श्री राम ढेंगळे श्रीमती स्वप्नाली पवार स्टाफ नर्स,, शेख मतीन यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिर पार पाडण्यास सहकार्य केले. तालुका न्यायालय सेलू येथील अधिकारी ,वकील व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

error: Content is protected !!