“मी भाजपाची, पण भाजप माझी थोडीच”, का म्हणाल्या पंकजा मुंडे…

0 52

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांनी घुसमट होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आहे. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोक म्हणतात पक्ष माझा. मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे. आम्हाला काही नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला”, तसेच त्या म्हणाल्या, “रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यातून त्यांची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

 

राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीने त्यांच्या वक्तव्यावरुन भाजपला टोला लगावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत यायचं असेल तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणालेत.

 

 

पंकजा मुंडे यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. स्वतः पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजीदेखील व्यक्त केली होती. आता त्यांनी त्यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा मांडली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे याबाबत म्हणाले, पंकजा मुंडे यांनी असं बोलून दाखवलं असेल तर ही भूमिका एकट्या पंकजाताईंची नाही. भजापाचे महाराष्ट्रातील, तसेच देशातील असे कार्यकर्ते आणि नेते आहेत ज्यांची घुसमट होत आहे, त्यांची भूमिका पंकजाताईंनी मांडली आहे.

 

 

पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असेही त्यांनी याआधी बोलून दाखवले होते. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलेले जात होते. दरम्यान, नाराजी व्यक्त करताना त्यांनी भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच असल्याचे देखील म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीत जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन सुरु आहे. यावर भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आता पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे, पण भाजप माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचेच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. या विधानावरुन त्या प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची देखील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया देताना म्हटले, पंकजा यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्यांचे आज अस्तित्त्व काय उरलंय? राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घेतला तरच त्यांचे अस्तित्त्व टिकून राहील.

error: Content is protected !!