सेलू-जिंतूर मतदारसंघात आपली उमेदवारी निश्चितच-सुरेश नागरे

0 293

सेलू ( नारायण पाटील )
मी सेलू – जिंतूर मतदारसंघात उभा राहणार नाही अशा अफवा जरी विरोधकांकडून केल्या जात असल्यातरी माझी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चितच आहे असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश नागरे (My candidacy is from congress party says suresh nagare) यांनी सेलू येथील पत्रकार परिषदेत केला.

 

यावेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नाना राऊत ,सेलू शहराध्यक्ष रहीम पठाण , महिला आघाडीच्या कमलताई लोखंडे आदींची उपस्थिती होती .मतदारसंघात एक विकासात्मक विचार घेऊन सुरेशराव नागरे हे विधानसभेसाठी काँग्रेस चे उमेदवार राहणार आहेत .त्यांच्या उमेदवारीच्या धसकीने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकत असल्याने त्यांच्या कडून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत .परंतु नागरे हे निश्चित ५०,००० च्या मताधिक्याने विजयी होतील व त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते कामाला लागले असून मतदारांचा देखील त्यांना चांगला पाठींबा मिळत आहे असे भाकीत नाना राऊत यांनी केले .

 

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना नागरे (suresh nagare) पुढे म्हणाले की ,महाविकास आघाडी मध्ये सेलू – जिंतूर मतदार संघ (jintur-selu vidhansabha) काँग्रेस ला सुटण्यासाठी आपण प्रयत्नशील असून निश्चित यश मिळणार आहे .व जरी नाही सुटला व आघाडी झाली नाही तरी आपली कांग्रेस कडून उमेदवारी पक्की राहणार आहे .

 

मागील काळात निवडून आलेल्या उमेदवारांनी केवळ टक्केवारी घेऊन स्वतःची घरे भरली .सध्या चालू असलेले जिंतूर सेलू रस्त्या तसेच इतर रस्ते देखील महाविकास आघाडी सत्तेत असतांनाच मंजूर झालेले आहेत . निवडून आलेल्या उमेदवारांनी अजूनही मतदार संघातील विकासात्मक कामे बाजूलाच ठेवली आहेत .सेलू तालुक्यातील एम आय डी सी ,बस डेपो ,१३२ केव्ही ही कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडली आहेत .आमचे सरकार आले तर निश्चित शैक्षणिक व विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल .सेलू तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत .परंतु जिंतूर तालुक्यात प्रत्येक घराघरात राजकारण शिरले असल्याने परस्थिती थोडी वेगळी आहे .आजही आपल्या कडील तरुणांना इकडे रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुणे मुबंई ला जावे लागते .त्यामुळे भविष्यात मुबंई पुण्याच्या धर्तीवर इकडे कशा संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत .या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन शहर प्रमुख रहीम पठाण यांनी केले.

error: Content is protected !!