राज्य उत्कृष्ट निर्यात पुरस्काराने सेलूतील ‘कोहिनूर रोप्स’ चा सन्मान

0 56

सेलू / नारायण पाटील – येथील प्रसिद्ध कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादक कंपनीला वर्ष २०१८ ते २०२१ असा सलग तीन वर्षे राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टेट एक्सपोर्ट अवार्ड’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या सुवर्ण पुरस्काराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे गुरुवार ८ फेबुरवारी रोजी विशेष समारंभात गौरविण्यात आले.आहे

 

 

कोहिनूर रोप्सचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक नंदकिशोर बाहेती व चेतन बाहेती यांनी पुरस्कार स्वीकारला. प्लास्टिक उत्पादन सेक्टरमधील सुवर्णसन्मान प्रमाणपत्र व रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे उद्योग विभागाच्या वतीने राज्य निर्यात पुरस्कार आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा, विकास व निर्यात आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह आदींसह मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दर्जेदार उत्पादन करून निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल या कोहिनूर रोप्सला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराबद्दल बाहेती यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!