शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त सेलूत २७१ महिलांच्या हस्ते कुंकुमार्चन पूजन

0 90

सेलू (प्रतिनिधी )
शहरातील श्री.परशुराम जन्मोत्सव समिती सेलू आयोजित शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त २७१ महिलांच्या हस्ते कुंकुमार्चन पुजन श्री.केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मंगल कार्यालय सेलू येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री.जगदंबा माता,श्री.भगवान परशुराम,ग्रामदैवत श्री.केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देवी प्रतिमा व श्री यंत्राचे विधिवत कुंकुमार्चन पुरोहित यांच्या मंत्रघोषात पुजन करून आरती करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या धार्मिक कार्यक्रमासाठी
श्री.परशुराम जन्मोत्सव समिती महिला व पुरुष सदस्य यांनी मोठे सहकार्य केले व परिश्रम घेतले.

error: Content is protected !!