हसत खेळत शिक्षण हेच गुणवत्तापूर्ण शाळेचे लक्षण- रविकुमार पेशकार
सेलू/प्रतिनिधी – येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात २०२४ -२५ शैक्षणिक वर्षाची प्रथम सत्र सत्रांत बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय कार्यकारणी सदस्य रविकुमार पेशकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पेशकार पुढे म्हणाले की, शिक्षक हा व्यासंगी असावा,त्याने मोबाईलचा अतिवापर टाळावा.शिक्षकांनी स्वतःची अशी आचारसंहिता तयार करावी,पालकांशी दांडगा संपर्क ठेवावा,नवीन शैक्षणिक धोरणांचा अभ्यास करावा,हसत खेळत शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवावा असे प्रतिपादन केले. व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी,जिंतूर तालुका संघचालक सुरेश ठोंबरे,उपेंद्र बेल्लुरकर,करुणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.प्रारंभी सरस्वती माता व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बालवाडीच्या अहवालाचे वाचन रसिका बावणे यांनी केले.अभ्यासपूरक विभागाची माहिती दीपाली पवार,मूल्यमापन विभागाची माहिती काशिनाथ पांचाळ,8 स्कॉलरशिप व समाजमाध्यम विभागाची माहिती विनोद मंडलीक,प्रगती विभाग तसेच स्पर्धा परीक्षा माहिती रागिणी जकाते,विस्तार व सेवा विभाग अनिल कौसडीकर,संस्कृती ज्ञान परीक्षा तसेच प्रसिद्धी विभागाची माहिती विजय चौधरी यांनी सादर केली.
उपेंद्र बेल्लूरकर व करुणा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विजय चौधरी,प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर शितोळे,पद्य दीपाली पवार,आभार करुणा कुलकर्णी यांनी मानले.बैठक यशस्वितेसाठी चेतन नाईक,मंगेश खरात,शारदा गिरी,सोनाली जोशी यांनी प्रयत्न केले.