बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
परभणाी,दि 21 ः
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,परभणी अंतर्गत बाल विद्यामंदिर हायस्कूल, परभणी येथील विधी साक्षरता मंडळ क्र. 1 च्या वतीने प्रशालेत आज कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट गणेश सेलूकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रवीण सोनोने यांनी केले. यामधून त्यांनी विधी साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा हेतू विशद केला.
विद्यार्थ्याना कायदेविषयक माहिती देऊन विद्यार्थ्यांनी ती इतरांना सांगावी व गुन्हेगारी वृत्ती पासून परावृत्त करावे या हेतूने विधी साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे विशद केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना ऍडव्होकेट गणेश सेलूकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून कायदा म्हणजे जीवन जगण्यासाठी घालून दिलेली पद्धती असून विद्यार्थ्यांना शिस्तीत जीवन जगता यावे यासाठी बालकांशी संबंधित कायद्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना आपले अधिकार , कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून दिली.
तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा दुरुपयोग टाळण्यासाठी आवाहन केले.
जीवनात योग्य संस्काराने आचरण केले पाहिजे. वडीलधाऱ्या मंडळींचा, गुरुजनांचा आदर केला पाहिजे. असे सांगत समाजातील इतर घातक गोष्टींबाबत सतर्क राहिले पाहिजे. व आपल्याबरोबर काही विपरीत घडत असल्यास ताबडतोब गुरुजन, वडीलधारी मंडळी अथवा संरक्षण व्यवस्थेशी संपर्क करण्याचे सुचित केले.व
शिक्षणाच्या माध्यमातून चांगला नागरिक घडून समाजात आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन केल्याने वर्तनात सुधारना होते. असे सांगत विद्यार्थ्यांनी वास्तवात जीवन जगावे व विद्यार्थी धर्माचे पालन करावे असे सुचित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभाग प्रमुख प्रवीण सोनोने यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची व शिक्षक वृंदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.