आ.राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ मानवत,सोनपेठला ऐतिहासीक विजयी संकल्प रॅली

0 79

परभणी,दि 18 ः
पाथरी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेकांना तिन ते चार वेळेस संधी मिळाली, परंतु त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, या विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी आपल्याला एकदा संधी द्यावी असे आवाहन महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी केले.
राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ मानवत येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थित विजयी संकल्प रॅली काढली. मानवत शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने विटेकर यांचे समर्थक आले होते.संपूर्ण शहरांमध्ये याच रॅलीची चर्चा होती. या रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलताना आमदार विटेकर म्हणाले,पाथरी मतदारसंघात आतापर्यंत आपण अनेक संधी दिली परंतु त्यांनी केवळ स्वहित जपले, मतदारसंघाला नेहमीच वाऱ्यावर सोडले. या मतदारसंघाचा विकास रखडला गेला, परंतु आपल्याला संधी दिल्यास अजितदादा पवार यांच्या माध्यमातून चार हजार कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात आनत  मतदारसंघाचा कायापालट करू, एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय पाहता आपला विजय निश्चित आहे हे देखील त्यांनी सांगितले. मानवत शहर आणि तालुका तसेच या संपूर्ण मतदारसंघात आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे, प्रस्थापित आणि  मतदार संघाला मागे ठेवणाऱ्या  उमेदवारांना त्यांची जागा दाखवायची आहे असे म्हणत,मी तुमचा आहे,यावेळी  सेवेची संधी द्या असे भावनिक आवाहन आमदार विटेकर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड,बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.गावागावातून कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहिले होते.
सोनपेठमध्ये प्रचंड मोठी रॅली
सोनपेठ शहरात राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. या रॅलीला संपूर्ण सोनपेठकर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक गावातून नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.सोनपेठच्या इतिहासात पहिल्यादांच  अभूतपूर्व अशी रॅली झाली.तसेच शेळगाव येथे देखील रॅली काढण्यात आली.

error: Content is protected !!