देऊळगाव दुधाटे येथील नदीपात्रात वाळु उपशाचे साहित्य जप्त
पूर्णा,दि 20 ः
पूर्णेतील नायब तहसिलदार प्रशांत थारकर आणि त्यांच्या पथकाने देऊळगाव दुधाटे येथील नदीपात्रात केलेल्या कार्यवाहीत एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली, तसेच एक तराफा जप्त केला.
दिनांक 20रोजी गोपनीय पद्धतीने सदर कार्यवाही तहसिलदार बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली, तर या पथकात ना. तहसिलदार प्रशांत थारकर यांच्यासह नामदेव कल्साईतकर, शेलाटे आदींसह तहसील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.