मयुरी गिल्डा यांची महिला व बालविकास पदावर झेप

0 209

सेलू / नारायण पाटील – जिद्द, मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर येथील मयुरी प्रणिल गिल्डा यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन करून महिला व बालविकास वर्ग अ पदावर झेप घेतली आहे.

 

मयुरी गिल्डा यांनी २०२२ मध्ये राज्य सेवा आयोगाची परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गिल्डा यांची महिला व बालविकास अधिकारी वर्ग १ पदासाठी निवड झाली आहे. सेलूतील लता व प्रफुल्ल गिल्डा यांच्या स्नुषा तथा सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सेलूचे भूमिपूत्र प्रणिल गिल्डा यांच्या मयुरी पत्नी आहेत. मयुरी यांचे जन्मगाव माढा (जि. सोलापूर) असून त्यांचे वडील स्व. प्रताप देशमुख हे विवीध साखर कारखान्यावर चीफ केमिस्टपदी काम करत होते. शालेय शिक्षण पंढरपूर, फलटण, अहमदनगर येथे तर लातूरच्या द‌यानंद कॉलेज मध्ये त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

 

 

 

त्यानंतर महाराष्ट्रातील नामांकित सीओईपी या कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासूनच त्या अतिशय हुशार विद्यार्थी होत्या. इयत्ता दहावी व बारावीत चांगले गुण घेतले होते. पदवी शिक्षणा दरम्यान पुणे येथे असताना त्यांनी स्पर्धा परिक्षा तयारी करून प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. मुळचा अभ्यासू स्वभाव, ध्येयनिष्ठा, त्याकरिता केलेली मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य या बळावर त्यांनी राज्य सेवा परिक्षेत यश संपादन केले. प्रशासकीय सेवेत काम करतांना सचोटीने सर्व सामान्य करिता काम करून लोकांची सेवा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मयुरी यांचा सासरे प्रफुल्ल गिल्डा, सासू लता गिल्डा आदींनी सत्कार केला.

error: Content is protected !!