श्री आर्ट कला वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सौ.राधा पत्रे (बोरामणे) राज्यातून प्रथम

0 145

पूर्णा, सुशिलकुमार दळवी – स्थानिक श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती मधील अमरावती जिल्ह्याचे कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये लौकिक असून यात भर पडली ती श्री आर्ट कला वर्गा च्या भरीव कलाकृती प्रशिक्षणाची. दरवेळी विविध कला प्रदर्शनीमध्ये आपल्या कलाकृतीद्वारे कला रसिकांना भुरळ पडणाऱ्या श्री आर्ट कला वर्ग च्या लौकिकामधे आणखी एक मोलाची भर पडली आहे. येथील विद्यार्थिनी सौ. राधा निलेश पत्रे(बोरामणे) आणि महाराष्ट्र शासनाच्या हस्त कौशल्य विकास (क्राफ टिचर) डिप्लोमा या परिक्षेत महाराष्ट्र मधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे

 

सौ.राधा निलेश पत्रे (बोरामणे) ह्या श्री आर्ट कला वर्ग व कला वर्गच्या दोन वर्षांपासून च्या विद्यार्थीनी आहेत. व त्या मुळच्या परभणी जिल्ह्यातील पुर्णा या गावच्या आहेत .यापूर्वी त्यांना कला क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या हस्त कौशल्य विकास (क्राफ टिचर) डिप्लोमा या परिक्षेत राज्यभरातून एक हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अमरावती जिल्ह्यातून ८०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून त्यामध्ये सौ. राधा निलेश पत्रे(बोरामणे) प्रथम क्रमांक पटकाविला आहे दरवर्षी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती मधुन ४०ते५०विद्यार्थी परिक्षेला बसत असतात सर्व विद्यार्थी चांगले यश संपादीत करीत आहे कला वर्गातील विद्यार्थी चे काम दुबई, कोटा , नागपुर, मुंबई, दिल्ली येथे पण मुलांनी यश संपादीत केले आहे सौ.राधा निलेश पत्रे यांनी संपादित केलेल्या यशा बद्दल सर्व स्तरात त्यांचे कौतुक होत आहे त्यांना श्री अनंत गुढे माझी खासदार अम.श्री.बच्चु कडु माझी राज्यमंत्री,श्री शरद नागठाणे, उमाकांत आप्पा पत्रे,सौ.वनमाला पत्रे,सौ.कल्पना नागठाणे, सौ.सारीका नागठाणे, सौ.सोनाली कदम,श्री.मोहन कदम कला शिक्षीका कु.मुक्ता विष्णू वाघ यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या या यशाचे श्रेय श्री आर्ट कला वर्ग व संचालक प्रा. सारंग नागठाणे यांना देत आहेत. सौ. राधा निलेश पत्रे यांच्या यशाबद्दल सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

error: Content is protected !!