पाथरी मतदार संघातील गावांना प्रगती,समृद्धी आणि आत्मनिर्भरतेकडे नेणं हाच माझा उद्देश-आ.राजेश विटेकर

विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संवाद  मेळावा

0 29

परभणी,दि 17 ः
या मतदार संघातील जनतेच्या  दु:खांची, त्यांच्या गरजांची आणि अपेक्षांची मला पूर्ण जाणीव आहे. पाथरी मतदार संघातील प्रत्येक गावांना,शहरांना प्रगती, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेकडे नेणं, हाच माझा उद्देश आहे.त्यासाठीच आपण कटिबध्द आहोत असे प्रतिपादन आ.राजेशदादा विटेकर यांनी केले.

विटा  ता.सोनपेठ येथे गुरुवार दिनांक 17 रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संवाद  मेळावा पार पडला.यावेळी आमदार राजेशदादा विटेकर यांनी कार्यकर्ते,पदाधिकारी,ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला.यावेळी बोलताना आ.विटेकर म्हणाले,पाथरी मतदार संघातील व्यथा
मी अनेक वर्षांपासून जवळून अनुभवल्या आहेत. या मतदार संघातील जनतेच्या  दु:खांची, त्यांच्या गरजांची आणि अपेक्षांची मला पूर्ण जाणीव आहे. ग्रामीण भागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ठोस धोरणे आखून, प्रभावी योजना राबवण्याचा माझा निर्धार आहे.माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवलात, तर पाथरी विधानसभा क्षेत्राला ग्रामीण विकासाच्या नवीन उंचीवर नेणे हे माझं प्रमुख ध्येय असेल. आपल्या शेतीची स्थिती सुधारणे, शिक्षणाच्या सुविधा वाढवणे, आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे हे माझ्या प्राथमिकतेत असेल. या सगळ्या प्रयत्नांतून आपल्या गावांना प्रगती, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेकडे नेणं, हाच माझा अंतिम उद्देश आहे असे सांगताना आ.विटेकर पुढे म्हणाले,माझी भूमिका केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही; तर तुमच्या सोबत राहून, तुमच्या समस्या जाणून, आणि गावाच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी तुमच्यासोबतच काम करण्याची आहे. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचं स्वप्न माझ्या मनात आहे, आणि ते साकार करण्यासाठी आपण साथ द्यावी असे आवाहन आ.विटेकर यांनी केले.
यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आ.विटेकर यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये  प्रवेश केला.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष  चंद्रकांत राठोड,बाजार समिती सभापती दशरथ सुर्यवंशी, विठ्ठल सुर्यवंशी,राम बेद्रे, श्रीकांत मोरे,विलास कोकाटे, रंगनाथ रोडे,मदन भोसले,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!