‘माझा अंदाज चुकला, मला…’ जाहीर सभेत पवारांनी भुजबळांबद्दल मागितली माफी

0 208

नाशिक, 08 जुलै : ‘काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं आम्ही निवडून दिलं, एकदा दोनदा आणि तीन वेळा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही इथं आलोय, कुणाचं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही, मी यासाठी माफी मागण्यासाठी आलोय, माझा अंदाज कधी चुकूत नाही, इथं माझा अंदाज चुकला’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये पोहोचले. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी जोरदार भाषण करून कार्यकर्त्यांची मनं जिंकली.दुष्काळी भागातला आपला शेतकरी असेल, सहकारी असेल त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळे असा विचार केला, दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांनी आम्ही जनतेच्या समोर सादर केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचे असेल तर भक्कम विश्वास दाखवायचा असेल तर येवल्याची निवड केली. काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं आम्ही निवडून दिलं, एकदा दोनदा आणि तीन वेळा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही इथं आलोय, कुणाचं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही, मी यासाठी माफी मागण्यासाठी आलोय, माझा अंदाज कधी चुकूत नाही, इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारांवर तुम्ही निकाल दिले, त्यावर तुम्हालाही यातना झाल्या. तुम्हाला माझ्या निर्णयामुळे वेदना झाल्या असतील तर माझं कर्तव्य झालं आहे, मी माफी मागितली पाहिजे. कधी कधी लोकांच्या समोर येण्याची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, वर्षभराने येईल, पण पुन्हा चूक करणार नाही. योग्य निकालाचा निकाल सांगेन, असं पवार म्हणाले.

error: Content is protected !!