प पू भानुदास महाराज जन्मशताब्दी निमित्त खेर्डा येथे नारदीय किर्तन महोत्सव सुरू
प पू सुरेश महाराज ,समर्थभक्त जगद्गुरू शंकराचार्य यांची उपस्थिती
सेलू ( नारायण पाटील )
खेर्डा हे जन्मस्थान असलेले गुरुवर्य प पू भानुदास महाराज रामदासी श्रीराम संस्थान साडेगाव यांच्या जन्मशताब्दी निमित्त , मठाधिपती गुरुवर्य प पू सुरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खर्डा येथे भानुदास महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीचे काम हाती घेतले असून त्यानिमित्त दि २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत भव्य नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
येथील मारोती मंदिर मध्ये आयोजित या कार्यक्रमात दररोज काकडा भजन रामकथा ,दासबोध पारायण ,प्रवचन ,हरिपाठ ,,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दररोज सकाळी ४ ते ५ काकडा भजन ,५ ते ८ ग्रँथराज दासबोध पारायण दि २६ मार्च पासून ९ ते १ यावेळेत रामनाम याग व पंचदिनात्मक पंच कुंडात हवन होणार आहे ,१ ते २ श्रीचे दर्शन ,२ ते ४ हभप सुनील महाराज आष्टीकर यांच्या मधुर व रसाळ वाणी मधून संगीत रामकथा ,५ ते ७ या वेळेत हरिपाठ व करुणाष्टके तसेच रात्रौ ९ ते ११नारदीय कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत .
कीर्तन कार्यक्रमात ह भ प दीपाली ताई कुलकर्णी ( परतूर ),ह भ प शेखर बुवा व्यास ( पुणे ),ह भ प उद्धव बुवा जावडेकर ( पुणे ),ह भ प वसंतबुवा मंडलिक ( सेलू ),ह भ प हरिचैतन्य स्वामी ( पळसखेडा ) ,ह भ प प्रकाश महाराज मुळे ( गोंदीकर ),ह भ प संदीप बुवा मांडके ( पुणे ) या नामवंत किर्तनकाराची कीर्तने होणार आहेत .तर दि ३० मार्च रोजी सकाळी यागाची पूर्णाहुती , शोभायात्रा तसेच सकाळी १० ते १२ यावेळेत ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . दररोज गावातील वेगवेगळ्या भाविकांकडून दुपारचे अन्नदान होणार आहे .तर खेर्डा येथील दिग्रसकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे .
दि २६ मार्च रोजी साडेगाव येथील राममंदिर संस्थान चे मठाधिपती प पू सुरेश महाराज यांचे येथे आगमन झाले असता गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती .दि २८ मार्च रोजी प पू जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ विद्या नृसिंह भरती कोल्हापूर यांचे आगमन होणार असून दुपारी ४ ते ५ या वेळेत त्यांचे प्रवचन होणार आहे .तसेच प पू समर्थ भक्त भरतबुवा रामदासी यांचे देखील दि २९ मार्च रोजी येथे आगमन होणार असून दुपारी ४ ते ५ यावेळेत प्रवचन होणार आहे .
तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन ,प्रवचन व कीर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी ,यज्ञ समिती तसेच तरुण मित्र मंडळ ,खेर्डा ता. सेलू जिल्हा परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे .