श्री शिवाजी महाविद्यालयात एनसीसी भरती प्रक्रिया संपन्न

सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण

0 4

 

 

परभणी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील (राष्ट्रीय छात्रसेना) एनसीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची तीन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. ही निवड नांदेड येथील 52-बटालियनचे कर्नल के दिलीप रेड्डी, सुभेदार राम दुलारे, हवालदार सुरेश सिंग, हवालदार यशवीर सिंग, एन.सी.सी. विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.२३) रोजी संपन्न झाली.

 

दिवसभर चाललेल्या या भरती प्रक्रियेत महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना सैन्य भरतीसाठी तसेच पोलीस भरतीसाठी सहाय्यक असलेल्या एनसीसी ए, बी आणि सी प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सवलत असते. त्यामुळे या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. मागील दोन वर्षापासून मुलींचे युनिट सुरू झाल्याने मुलींनाही यामध्ये संधी वाढल्या आहेत. यावेळी, शारीरिक चाचणी,कागदपत्रे तपासणी आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशसेवा आणि भारतीय सैन्याविषयी आकर्षण वाढविण्याचे काम सदरील एनसीसीच्या वतीने केले जाते. एनसीसी परीक्षेचे सी प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले शेकडो विद्यार्थी सैन्य दलात भरती झाल्याचे मत लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ यांनी व्यक्त केले. यासाठी सैन्य दलातील मार्गदर्शक तत्त्वानुसार सदरील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे मत कर्नल के दिलीप रेड्डी यांनी व्यक्त केले. तसेच या प्रसंगी कर्नल के. दिलीप रेड्डी यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ आदींनी केले. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी समितीचे सदस्य डॉ.जयंत बोबडे, डॉ.संतोष कोकीळ, डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.राजू बडूरे, प्रा.राजेसाहेब रेंगे, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड, गणेश गरड आदीनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!