परभणीत राष्ट्रवादीने केले मुक आंदोलन,मालवण घटनेचा केला निषेध

0 8

परभणी,दि 29 ः
मालवण येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवेलाना झाल्याच्या निषेर्धात परभणीत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी  मूक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

आठ महिन्यांमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याची जी अवहेलना झाली. ती अत्यंत क्लेशदायक व त्रासदायक आहे.याबाबत  राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून वसमत येथील जाहीर सभेत महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागितली व त्यांनी जाहीर सभेत सांगितलं याच्यामागे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे  सांगीतले आहे. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे मूक आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला व शिवप्रेमींसाठी ही मनाला चटका लावणारी गोष्ट आहे.त्यामुळे ताक्ताळ दोषीवर कारवाई करत भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत, राजू शिंदे,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदा राठोड,युवकचे शहराध्यक्ष किरण तळेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, सुनील गोळेगावकर, गजानन काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!