विकासकार्यात कसलाही भेदभाव कधीच केला नाही-आ.डॉ.गुट्टे

खळी येथे १ कोटी ४६ लक्ष ८० हजार निधींच्या विकास कामांचे भूमिपूजन

0 21

गंगाखेड (प्रतिनिधी):-
राज्यातल्या महायुती सरकार करीत असलेल्या गतिमान विकासाला साथ देत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सुख, सोयीसाठी विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामध्ये कधीच कसलाही भेदभाव केला नाही आणि यापुढेही होणार नाही, अशी स्पष्टोक्ती स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली.

तालुक्यातील मौजे.खळी येथील विविध विकास कामांचे भव्य भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले.‌ तेव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी गेल्या चार वर्षांच्या कामगिरीचा तसेच विविध कामांचा आढावा उपस्थितांच्या समोर मांडला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

त्यामध्ये २५/१५ अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे १३ लक्ष रूपये, उप आरोग्य केंद्र इमारत १ कोटी रूपये आणि जिल्हा परिषद शाळा इमारत ३३ लक्ष ८० हजार रूपये या कामांचा समावेश असून त्यासाठी १ कोटी ४६ लक्ष ८० हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे.

शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या तिन्ही बाबींची हि विकासकामे ग्रामीण विकासाला हातभार लावतील.‌ हि कामे पूर्ण झाल्यास पाल्यांच्या शिक्षणास व नागरिकांच्या आरोग्यास सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे गावकरी समाधानी आहेत, हे पाहून आनंद वाटला. भविष्यात सुध्दा गावात विकास कामांची हि परंपरा अशीच सुरू राहिल. यासाठी ग्रामीण भागात विकासकामे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असतो.‌ कारण, ग्रामीण भागाचा विकास हाच प्रगतीचा मार्ग आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके,उपसभापती संभाजीराव पोले,ॲड.गौरशेटे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ बापू सातपुते, सरपंच शिवा पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!