आता थेट ‘हवे’वर रेल्वे धावणार..

0 59

 

भारतात पुढील महिन्यात, डिसेंबर 2024 मध्ये दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे. देशात रस्त्यांचे जाळे घट्ट आहेत. तर आता रेल्वेचे जाळे पण दाट करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. त्यातच पुढील महिन्यात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. पर्यावरणाला अनुकूलतेसोबतच ही रेल्वे प्रवाशांसाठी आरामदायक असल्याचा दावा करण्यात येत आहे. डिझेल आणि वीजेशिवाय ही रेल्वे धावेल. 2030 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी भारताचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानण्यात येत आहे. यामुळे रेल्वेची गतीशीलता तर वाढेलच पण पर्यावरणवर जपण्यात मोलाचा हातभार लागेल.

 

हवेने धावणार ट्रेन (The Train will run by air)

ही देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन असेल. ही ट्रेन वीज तयार करण्यासाठी पाण्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून वापर करेल. पारंपारिक डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनऐवजी ही रेल्वे हायड्रोजनचा वापर करेल. ही रेल्वे हायड्रोजन इंधन सेल, ऑक्सिजनसह मिळून वीज तयार करेल. त्यातून वाफ आणि पाणी उत्सर्जित होईल. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.

 

रेल्वेचा ड्रीम प्रोजेक्ट (dream project of railway)

हायड्रोजन रेल्वे हा भारतीय रेल्वेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचा उद्देश कार्बन फ्रुटप्रिंट कमी करणे आणि डिझेल इंजिनामुळे होणारे वायू प्रदुषण कमी करणे असे आहे. हायड्रोजन इंधन सेलचा उपयोग केल्याने ट्रेन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिकुलेट मॅटर उत्सर्जित होणार नाही. प्रवासासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.

 

रेल्वेची भविष्यातील योजना काय? (Future plan of railway)

हायड्रोजन रेल्वे केवळ पर्यावरणनुकूल आहे असे नाही, तर तिच्यामुळे गोंगाट सुद्धा कमी होईल. डिझेल रेल्वेमुळे ध्वनी प्रदूषण होते. त्या तुलनेत ही रेल्वे 60 टक्के कमी गोंगाट करेल. देशभरात रेल्वे विभाग अशा 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याच्या विचारात आहे. भारतीय रेल्वे एक स्वच्छ, शांत आणि स्वस्त पर्याय देण्याच्या विचारात आहे. हायट्रोजन ट्रेनचा पहिला पायलट प्रकल्प हा हरयाणातील जींद-सोनीपत या रेल्वे मार्गावर होईल. ही ट्रेन 90 किलोमीटरचे अंतर कापेल. यासोबत दुर्गम भागात, पर्यटन स्थळावर ही रेल्वे धावेल. यामध्ये दार्जिलिंग, हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटेन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे अशा ठिकाणांचा पण समावेश आहे.

.

error: Content is protected !!