नूतनच्या इनडोअर क्रीडा हॉल मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत-जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे

0 39

सेलू / नारायण पाटील – परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने क्रीडा सुविधा योजना अंतर्गत उभारण्यात आलेले बंदीस्त प्रेक्षागृह परभणी जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर घालणारे असुन या इनडोअर क्रीडा संकुलातुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, संकुलाच्या उर्वरीत उभारणीसाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी केले.

 

येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू व परभणी जिल्हा तलवार बाजी असोसिएशन च्या वतीने गुरूवार दि.२३ मे रोजी आयोजित तलवारबाजी व कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन व तालुका क्रीडा संकुलाची पहाणी करताना उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन शिक्षण संस्थांचे अध्यक्ष डॉ सत्यनारायणजी लोया,प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी, डॉ पांडुरंग रणमाळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे,तालुका क्रीडाधिकारी नानकसिंग बस्सी,मुख्याध्यापिका सौ उज्ज्वला लड्डा, प्रा डॉ के के कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

या प्रसंगी संस्था सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी यांनी इनडोअर क्रीडा संकुल उभारणी साठी संस्थने दिलेले योगदान , शासनाकडून मिळालेले सहकार्य व उर्वरित कामासाठी अपेक्षित निधी या बाबतीत माहिती पाहूण्यांना दिली.
या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व अमृतायन हा विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव डॉ विनायकराव कोठेकर यांनी केले. सुत्र संचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, प्रशांत नाईक तर सुभाष मोहकरे यांनी आभार मानले. प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना तलवार बाजी व कबड्डी चे तंत्रशुद्ध प्रशिक्षण NIS खेळाडू संजय भूमकर, पांडुरंग रणमाळ, प्रशांत नाईक हे देणार आहेत या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराग आंबटी, राहुल घांडगे,सिध्देश्वर गवळी, वेदांत बोचरे,रत्नेश्वर घांडगेआदींनी परिश्रम घेतले.

 

 

तालुका क्रीडा संकुलाची पाहाणी करून येथील असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली व पुढील कालावधीत येथे असणाऱ्या काही गैर सोयी तात्काळ दुर करण्या बाबत ग्वाही दिली, या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, संजय मुंढे, नानकसिंग बस्सी, डॉ.पांडुरंग रणमाळ यांचा सत्कार सेलू तालुका बॅडमिंटन असोसिएशन व सेलू तालुका कबड्डी असोसिएशन च्या वतीने जितेंद्र घायतडक,ऋषीकेश टेळकीकर, श्याम पांचाळ, कृष्णा बोराडे , अर्जुन पंडित आदींनी

error: Content is protected !!