३० एप्रिलला ‘युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव’सिनेगायक आदर्श शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी
परभणी,दि 25 (प्रतिनिधी)ः
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित परभणी येथे रविवारी (दि.३०) युगप्रवर्तक अभिवादन ‘ महोत्सव व सुप्रसिद्ध सिनेगायक आदर्श शिंदे यांच्या ‘भीमगीत संगीत रजनी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी मंगळवारी (दि.25) पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील विष्णु जिनिंग मैदान, अक्षदा मंगल कार्यालय समोर वसमत रोड येथे सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन माहित मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या होणार असून अध्यक्षस्थानी काँग्रेस एससी,एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के.राजू हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लीलोटिया, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो व भिक्खू संघ देणार आहे. तसेच दिनांक १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनिमित्त आयोजित उत्कृष्ट देखावा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात येईल. या उत्सवाचे हे १६ वे वर्ष असून यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या जयंती समित्यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या महोत्सव सोहळ्याला शहर व जिल्ह्यातील समाज बांधव, महिला मंडळ युवा वर्ग उपस्थित राहणार आहे, असे आयोजक तथा निमंत्रक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले. यावेळी मिलींद सावंत,आकाश लहाने,मंचक खंदारे उपस्थित होते.