शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे नियोजन सुरु-संजय राऊत

0 45

मुंबई : कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

lokseva sticker

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. (Shiv Sena Dussehra Melava )शिवसेनेचा हा दसरा मेळावा यंदा कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. यंदा ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असंही राऊत म्हणालेत. (Shiv Sena’s Dussehra rally will be held – Sanjay Raut)

shabdraj reporter add

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला. परंतु या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला. याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचापहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. ‘मिशन बिगेन’ अंतर्गत अनेक गोष्टींवरील बंधने शिथिल करण्यता आली असली तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध आहेत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याची  उत्सुकता आहे.

 

error: Content is protected !!