आयएएस पूजा खेडकर प्रकरणात पीएमओने घेतली दखल,सोबत पुणे पोलीसही करणार कारवाई
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची 2023 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे. दरम्यान, काल (10 जुलै) पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागिला आहे. मसुरीस्थित लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA), जे नागरी सेवा उमेदवारांना प्रशिक्षण देते, खेडकर यांच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाईल.
बदली झाली, पण आता कागदपत्रांवर सवाल
पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.
ओबीसी, पीडब्ल्यूबीडी कार्ड खेळले!
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सेवा वाटप यादीनुसार, पूजाने OBC आणि PWBD (बेंचमार्क अपंग व्यक्ती) श्रेणी अंतर्गत अखिल भारतीय रँक 821 सह IAS श्रेणी घेतली आहे. विशेष म्हणजे, पूजाने ओबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज केला होता. ज्यात क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ₹8 लाख आहे.
पुणे पोलीस कारवाई करणार
पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आहे. दरम्यान, पुजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरुप काय असेल, त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट होईल.
बदली झाली, पण आता कागदपत्रांवर सवाल
पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना सरंजामी थाटात वावरण्यामुळे चर्चेत असलेल्या पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पूजा खेडकर यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी म्हटले की, मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय, इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही. यावेळी पूजा खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नावरुन, नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी, ‘मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, या प्रकरणात मला सरकारने काही बोलायला परवानगी दिलेली नाही. मी आज वाशिमममध्ये रुजू झाली आहे’, असे खेडकर यांनी म्हटले. यानंतर पूजा खेडकर तिथून निघून गेल्या.