प्रपंचाला विरोध न करता मानवी जीवनाला उच्च पदावर नेणारे आदर्श म्हणजे प्रसायदान-चैतन्य महाराज देगलूरकर

0 109

 

सेलू / नारायण पाटील – पसायदान हे मानवी जीवनाला मिळालेले अमृत आहे.या पसायदानामधून मानवी जीवनाला मिळणारे मूल्य अमृतच आहे.या पसायदानाला विरोध न करता मानवाच्या जीवनाला उच्च पदावर नेऊन ठेवणारे आदर्श म्हणजे पसायदान आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.

 

 

येथील साईबाबा मंदिरातील भव्य सभागृहात पंढरपूर येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प.श्रीगुरु चैत्यनमहाराज देगलूकर यांच्या ” पसायदान ” या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते.

 

येथील वसंत प्रतिष्ठान तथा खारकर परिवाराच्या वतीने ” पसायदान ” या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रवचन मालेतील चौथे पुष्प देगलूरकर महाराजांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात यशवंत चारठाणकर यांच्या ” समाधी साधन संजीवणू नाम” या गीताने झाली . यावेळी तबला साथ शिवाजी पाठक तर ,हार्मोनियम ची साथ शंतनू पाठक तसेच प्रकाश सुरवसे यांनी दिली.

 

 

यावेळी ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालुरकर,उद्योजक तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर,ऍड.उमेश खारकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर,माजी आमदार विजयराव भांबळे ,जी प परभणीचे माजी सभापती अशोकराव काकडे , के बा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, ह भ प मारोती महाराज वाघ,मंचकराव वाघ,हेंगडे गुरुजी,दत्तराव पावडे,ह.भप.भगवान महाराज डासाळकर आदींनी यावेळी संत पूजन केले .

 

 

यावेळी पसायदानाचे पायसदान रुपी प्रवचनात निरुपणात पसायदानातील तिसऱ्या ओवीबाबत बोलतांना चैतन्य महाराज देगलूरकर यांनी स्पष्ट केले की , प्रपंचाला विरोध न करता मानवाच्या जीवनाला उच्च पदावर नेऊन ठेवणारे आदर्श म्हणजे पसायदान होय . पसायदान म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली मागणी आहे . समाजाला सुधारण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीला सुधारणे गरजेचे असते .संतांनी नेहमी साध्याची मागणी न करता साधनाची मागणी केलेली आहे .

 

 

स्वकष्टाने कमावलेले हजार रुपये देखील आयत्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या तुलनेत किती तरी पटीने जास्त असतात . समाजाला प्रगतिशील व सजग बनवायचे असेल तर कष्टा विना मिळवण्याची शिकवण त्याला देता कामा नये . संत तत्वज्ञान नुसते सांगत नसतात तर स्वतःच्या आचरणात आणतात .

 

कष्टाने प्राप्त केलेल्या वस्तूचे मूल्य टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे .वस्तू जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत त्याचे मूल्य मोठे असते परंतु प्राप्ती नंतर त्याचे मूल्य कमी होते .व अशा वस्तूच्या प्राप्ती साठी जीवन घालवणे याला काहींच अर्थ नाही .प्राप्ती आणि अप्राप्ती याचा सांधा म्हणजे प्रयत्न असतो . मानवी जीवनाचे चित्र म्हणजे पसायदान आहे .
सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प संजय पिंपळगावकर यांनी केले .

error: Content is protected !!