भाजपने आगळ्यावेगळ्या पध्दतीने केलेल्या प्रचाराची जनतेत चर्चा

सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न चर्चेत

0 2

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या प्रचार तोफा दि. 18 नोव्हेंबर रोजी थंडावल्या आहेत. या निवडणूकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार प्रचार केला. या प्रचाराचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य नागरिक होता. सोशल मिडीयाचा अतिशय उत्तमरित्या वापर करून भाजपने जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

 

भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. व्हिडीओ, बॅनर पोस्ट, फेसबुक पोस्ट आदी विविध माध्यमांतून जाहिराती करण्यात आल्या. यामध्ये व्हिडीओने लोकांना आकर्षित केले. आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातलाय.

विधानसभा मतदारसंघ व तेथील स्थानिक प्रश्‍नानूसार आसपासच्या भागातील मुद्दे यांवर हे व्हिडीओ बनले आहेत. यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळाले. भाजपच्या आमदारांनी विकासकामे करत, हे प्रश्‍न सोडवले. तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात.
राज्यपातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच, तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक, भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले गेले.

error: Content is protected !!