रेल्वे प्रशासन मराठवाड्यातील सामान्य प्रवाशांच्या मुळावर

0 218

सेलू (नारायण पाटील)
देवगिरी एक्सप्रेस ही नांदेड ते मुंबई प्रवासासाठी मराठवाड्यातील सामान्य जनतेची असणारी महत्त्वाची रेल्वे गाडी. या गाडीने मोठ्या प्रमाणात रुग्ण , व सरकारी कामासाठी सामान्य जनता मुंबई ला जाते.

मुळात ही गाडी सुरु करण्यात आली ती मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई ला जाण्यासाठी पण मराठवाडी माणसाच्या दुर्लक्षामुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे ही रेल्वे पहिले निजामाबाद नंतर सिकंदराबाद व आता नामपल्ली पर्यंत वाढवण्यात आली हे जरी वरवर कनेक्टिव्हिटी वाढली असे वाटत असले तरी पण या मुळे मराठी माणसाला आता या गाडीत जागा मिळणे कठीण झाले असतानाच पहिले एलबीएच कोचच्या नावाखाली दहा स्लीपर कोच चे नऊ कोच केले मात्र एसीच्या डब्यांची संख्या कायम ठेवले व आता लिंगमपल्ली पर्यंत वाढवल्यावर तर हे स्लीपर कोच तर आता सातच करण्यात आले आहेत व एसीचे मात्र दोन डब्बे वाढवण्यात आले आहेत.

देवगिरी एक्स्प्रेस ने मोठ्या प्रमाणात रुग्ण व सरकारी कामासाठी जाणारी सामान्य जनता असते त्यांना एसी चे तिकीट परवडत नाही. एकीकडे दहा स्लीपर कोच असतांना मोठ्या प्रमाणात वेटींग लिस्ट असायची आता तर हे कोच वाढवण्या ऐवजी कमी करुन सातच करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सामान्य मराठी प्रवाशांचे हाल होणार हे नक्की.

नांदेड स्थानकावर सायंकाळी देवगिरी एक्स्प्रेस च्या वेळीच एक नंबर फलाटावर निजामाबाद कडे जाणारी गाडी लावलेली असते व ती उशीरा सुटते त्या नंतर कोच पोझिशन टाकली जाते व मग देवगिरी एक्सप्रेस येते या मुळे प्रवाशांची पळापळ होते व गाडी सुध्दा रोजच उशीरा चालते.

प्रवाशी ( पॅसेंजर ) गाड्यांचे तर खुप हाल आहेत. संध्याकाळी ची नांदेड मनमाड गाडी तर रोजच दोन तास उशीरा चालते त्या मुळे सामान्य प्रवाशांचे तर बेहाल आहेत . पुर्वी ही गाडी नांदेड वरुन सायंकाळी सहा वाजता सुटे तेव्हा सर्वांच्या सोईची होती पण एक्सप्रेस गाड्या आधी व सामान्य प्रवाशांकडे दुर्लक्ष या धोरणामुळे या गाडीची माती करण्यात आली आहे. तेच हाल मराठवाडा एक्सप्रेस चे.

या उलट दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत आहे व डब्यांची संख्या भरपूर असते.

या सामान्य प्रवाशांच्या प्रश्नाकडे आमचे लोकप्रतिनिधी ने व जालन्याचेच रेल्वे राज्यमंत्र्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!