श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांचे इस्रोच्या चेअरमनकडून कौतुक

0 49

परभणी,दि 20 ः
भारतरत्न पुरस्कार प्राप्त, मिसाईल मॅन तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या 92 व्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 15 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी हॉटेल स्टार पॅलेस रामेश्वरम-तामिळनाडू या ठिकाणी एपीजे एम. शेख सलीम ( डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नातू) यांनी स्थापन केलेल्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते.
परभणी येथे 06 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेतील निवड झालेल्या देशभरातून नाविन्यपूर्ण आलेल्या 20 प्रकल्पांचा सहभाग यामध्ये होता. यामध्ये परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात हरिओम सोनवणे, भूमिका अग्रवाल, अबोली यादव व रितिका जाधव यांनी Gesture control system या प्रकल्पाचे सादरीकरण महाविद्यालयाचे संचालक डॉ.आनंद पाथ्रीकर यांच्या प्रेरणेतून तसेच प्रा.अजय वाढवे व प्रा. बी. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनात रामेश्वरम येथील प्रदर्शनात सदरील प्रकल्प मांडण्यात आला होता. याचे अवलोकन इसरोचे चेअरमन डॉ. एम. सोमनाथ, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख व इतर मान्यवरांनी केले.
यावेळी इसरोचे चेअरमन कडून सदरील प्रकल्पाचे कौतुक करण्यात आले. तसेच संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तरुणच वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात देशाला उभारी देऊ शकतात असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस श्री सतीशभाऊ चव्हाण, सहसचिव श्री अनिलभाऊ नखाते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री संग्रामभैय्या जामकर, श्री स्वराजसिंह परीहार, श्री रणजीत काकडे यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!