आ. बाळापूर ते नाशिक बस सेवा सुरु; प्रवांशामध्ये समाधान

0 62

 

आ. बाळापूर, प्रतिनिधी – अनेक दिवसा पासून आ. बाळापूर ते संभाजी नगर बस सेवा सुरु करावी अशी प्रवासी बांधवातून मागणी होत होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त भटक्या जाती जमाती सेल चे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर्सिंग बावरी यांनी या बाबतीत सतत परिवाहन महामंडळ कडे पाठपुरावा केला होता. त्याच्या मागणी ला आज यश आले असून परिसरातील नागरिकांना व व्यापारी बांधव यांना लाभ होणार आहे. संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे उच्च न्यायालयात विविध कार्यालयीन कामे असल्याने ही बस सेवा खूपच फायदेशीर ठरणार आहे. या सेवे मुळे वेळेची बचत तर होणार आहेच. शिवाय आर्थिक भुर्दंड सुद्धा कमी बसेल , आज दी 1मे चे औचिते साधत आ.बाळापूर ते नाशिक कर बस सेवा सुरु झाली आहे. सकाळी 7वाजता हि बस बाळापूर ,कळमनुरी , हिंगोली ,औंढा ,जिंतूर ,जालना ,संभाजीं नगर या मार्गाने सायंकाळी 7 वाजता नाशिक येथे पोचेल व सकाळी 4वाजता परतीच्या प्रवासाला येईल या प्रवासी सुविधे मुळे प्रवासी वर्गातून समाधान वेक्त करण्यात येत आहे.

 

 

आज सकाळी या बस सेवेंच चालक गणेश मोरे व वाहक विजय राऊत ,तसेच विष्णू इंगोले , आगर प्रमुख नवनाथ डुकरे , यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी सं. पो.नी.पंढरीनाथ बोधनापोड काँग्रेस चे जेष्ठ नेते मोहंमद जक्की कुरेशी ,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संतोष बोंडारे , पत्रकार शफी डोंगरगावकर , विनायक हेंद्रे ,प्रशांत सूर्यवंशी, पप्पू पाटील बोंडारे ,काँग्रेस चे शहर अध्यक्ष डॉ. अरुण सुरयवंशी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष ठमके ,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष अनिल बोंडारे , यशवंत खाडे, सुशील बोंडारे ,विनोद जराड , प्रल्हाद बोंडारे , रवींदरसिग् बावरी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते , ठाकूर्सिंग बावरी यांच्या मागणीला यश आल्याने त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!