उन्हाळी स्पेशल गाड्या चालवा- मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ
परभणी / दि.29 नांदेड विभागातून गोवा,काशीसह हरिद्वार,ऋषिकेश,देहराढुन आदी ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने नूतन विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती नीता सरकार यांच्याकडे केली आहे. नांदेड विभागाच्या नवीन रेलवे व्यवस्थापक म्हणून श्रीमती नीता सरकार यांनी सूत्रे हाती घेतली आहेत त्याबद्दल आज नांदेड येथे रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत विविध रेल्वेच्या समस्यांबाबत व्यापक चर्चा करण्यात आली.कोविड पूर्वी सुरू असलेली नांदेड- छत्रपती संभाजीनगर ही रेल्वे पुन्हा सूर करण्यात यावी हे साकडे घालण्यात आले तसेच नांदेड विभागात चालणाऱ्या गाड्याचे लूज टाईम कमी करावेत,नांदेड हुन गोवा,काशी,ऋषिकेश सह हरिद्वार,देहरादून साठी उन्हाळी स्पेशल गाडी चालवावी,तसेच संभाजीनगर ते कोल्हापूर,नांदेड ते बिकानेर ही गाडी चालवावी तसेच नांदेड पनवेल आणि पुणे या दोन्ही गाड्यांना पाच अतिरिक्त स्लीपर कोच जोडावेत आदी मागण्या करण्यात आल्या तसेच परभणी रेल्वे स्थानकावरील दादरा चालू करावा तसेच पार्किंग बाबत ही गुतेदार हा प्रवासी लूट करत असल्याची तक्रारी असल्याने रेल्वे द्वारे अधिकृत तपासणी होऊन दर निश्चित करावेत आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या .या वेळी रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे,हर्षद शहा, किरण चिद्रवार,उमाकांत जोशी,रुस्तुम कदम,रविशंकर जोशी,अमित कासलीवार आदी उपस्थित होते