साईबाबा नागरी सह बॅंक बँको पुरस्काराने सन्मानित; सलग नवव्या वर्षी मिळाला पुरस्कार
सेलू, नारायण पाटील – राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या साईबाबा नागरी सह बँक ला अविज पब्लिकेशनच्या वतीने सलग नऊ व्यादा बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण दिनांक28/02/23 मंगळवारी साय 7. वाजता महाबळेशवर येथील एव्हर शाईन रिसोर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी नॅफकब चे अध्यक्ष जोतींद्र मेहता अधिकारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे अविनाश जोशी (मुंबई),,अशोक नाईक, अविनाश शिंत्रे संचालक बॅंको यांच्या हस्ते बँकेचे सस्थापक अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर,, मुख्य कार्य कारी अधिकारी श्री रामराव लाडाने संचालक श्री राजेंद्र आडळकर, सुभाष चव्हाण, अड भगवान शिरसाठ,, श्री गगाधर आडळकर, सुनील आडळकर, शेख जुनेद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इग्मा पुणे यांच्या वतीने राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे कठीण निकषांच्या आधारे माहिती घेऊन परिक्षण केले जाते. या सर्व निकषात साईबाबा नागरी बँक अव्वल ठरली. त्यामुळे सलग नऊ वेळेस बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. साईबाबा नागरी बँक ही , सेलू, परभणी, मानवत, वालूर, जितूर,बोरी या सहा शाखेतुन काम करत आहे. संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणीकृत केल्या असून ग्राहकांना आरटीजीस, एनएफटी, मोबाईल बँकिंग, एटीम, क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे. सर्वच शाखांमध्ये उच्च विद्याविभूषित कर्मचारी वृंद ग्राहकांना आपली सेवा देण्यास सदैव तत्पर असतात. बँको पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर यांनी सांगितले की, सभासद व ग्राहक याच्या सहकार्य ने हा सलग पुरस्कार मिळत आहे सचालक मंडळ,ग्राहक व सभासद कर्माचारी याचे कौतुक केलेआहे