रस्त्याचे काम डी पी प्लॅननुसार होत नसल्याबाबत सेलूत उपोषण सुरू

0 74

सेलू / नारायण पाटील – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान अभियाना अंतर्गत ,सेलू नगर परिषद रस्ते विकास प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालया मार्फत सादर करून नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सेलू शहरात विविध भागात ११५ कोटींची १८ कामे प्रगतीपथावर आहेत .परंतु सदरील कामे दर्जाहीन व निकृष्ठ दर्जाची होत आहेत .या सर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून दोषी अधिकारी ,अभियंते व संबंधित कंत्राटदार यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी .व सदरील सर्व कामे डी पी प्लॅन नुसारच केली जावीत .या मागणी साठी सुजान नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उघडे यांनी १८ जून पासून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे .

 

सदरील कामे केवळ बिले काढण्याच्या व पैसे कमावण्याच्या उद्देशाने भर पावसाळ्यात घाई गडबडीने केली जात आहेत .कामे करतांना शासन नियमांची पायमल्ली होत आहे .
वास्तविक पाहता रस्ताचे काम सुरू करण्याअगोदर त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून घेऊन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन चे तसेच विद्युत पोलचे शिपटींग करणे गरजेचे आहे .व त्यानंतरच नालीचे खोदकाम करून रस्त्याच्या एका बाजुचे काम सुरू करून दुसरी बाजू नागरिकांना रहदारीसाठी ठेवली जाते .परंतु याठिकाणी तसे केले जात नाही .तसेच रोडचा उतार व्यवस्थित न केल्या जात नसल्यामुळे चढ उतार होऊन भविष्यात पाणी साचण्याची दाट श्यक्यता आहे .तसेच रस्त्याची रुंदी देखील ३० मीटर व २४ मीटर ची असतांना आपल्या मर्जीनुसार १८ व १६ मीटर केली जात आहे . बऱ्याच ठिकाणी तर खोदकाम न करता दीड वर्षांपूर्वी केलेल्या रोड वरच रोडचे काम करून पूर्ण बिल उचलले जात आहे .व हे सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अभियंता मूग गिळून उघड्या डोळ्यांनी पहात आहेत .बऱ्याच ठिकाणी तर आधी शहरातील कचरा टाकून त्यावर मुरूम टाकल्या जात आहे .
तरी सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उघडे यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात केली आहे .

error: Content is protected !!