सेलूत राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा

0 136

सेलू ( नारायण पाटील )
शहरातील नूतन महाविद्यालय येथील सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू, तहसिल कार्यालय, व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाणे आयोजित 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन हा दि 30 डिसेंबर रोजी नूतन महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन उपप्राचार्य डाॅ महेंद्र शिंदे, प्रमुख पाहुणे शाखा व्यवस्थापक विजय पाटील, तहसीलदार दिनेश झांपले,
प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे, नायब तहसीलदार गजानन इनामदार, अखील भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालूका संघटक सुनील गायकवाड, सचिव मंजुषा कुलकर्णी, किरण सोळंके, तालूका उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर,प्रा डाॅ सुषमा सोनी, अशोक राऊत, सिद्धार्थ गायकवाड, ललीता गिल्डा,जयचंद खोना,एॅड भुषण गेना, योगेश कथले अरुण आढे, सचिन कोरडे,प्रदीप मुनेश्वर, आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे व शाखा व्यवस्थापक विजय पाटील , प्रा डाॅ सुषमा सोनी यांनी ग्राहक चळवळीच्या अनुषंगाने आणि ग्राहक यांचे हित यावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिनेश झांपले, सुत्रसंचलण प्रा नागेश कान्हेकर, तर आभार प्रदर्शन गंगाधर कान्हेकर यांनी उपस्थितांचे आभार माणले.

कार्यक्रमाच्या यश्वतेसाठी तहसिल कार्यालय येथील कर्मचारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू, नूतन विद्यालयातील येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न झाला

error: Content is protected !!