सेलूत महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन
सेलू / प्रतिनिधी – स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केलेले, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती त्या निमित्त आज सेलू येथील मोंढा मार्केट येथील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी जी प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकराव काकडे सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे उपसभापती प्रकाशजी मुळे, कॉ. दत्तूसिंग ठाकूर, कॉ.रामेश्वर पौळ, धनंजय भागवत, राजूभाई सोळंके,उदय रोडगे, गौस लाला, प्रदिप भैय्या कदम, निहाल भाई, पद्माकर जाधव सर, कॉ.अशोक उफाडे, राजेश पडुळे,सचिन धापसे, मनोज गोरे, विनोद शेरे, चेतन निकम आदी साथीदार समवेत होते.