संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचे आर्वी मध्ये दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत

0 24

 

आर्वी, प्रतिनिधी – दिनांक २६ ऑगस्ट शुक्रवार रोजी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व संभाजी ब्रिगेड पक्षाची युतीची घोषणा केली.

 

या निर्णयाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत केले गेले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय बदलाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी संभाजी ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,शिवसेना , युवासेना च्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी येथे एकत्रित येवून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

 

यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षिरसागर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ जाधव,शिवसेना तालुका प्रमुख गुड्डू गावंडे,युवासेने चे जिल्हा उपाध्यक्ष महेश चौधरी,संभाजी ब्रिगेड आर्वी तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे,संभाजी ब्रिगेड
जिल्हा सचिव रवी घाडगे,संभाजी ब्रिगेड चे पियूष रेवतकर,गणेश पंधराम ,नरेश निनावे,शुभम राजे,चेतन आत्राम,आकाश हिरेखन,निलेश घुगरे,वीर काठाने,शुभम गोसावी,पियुष मेन्द्रे तसेच शिवसेनेचे सर्वेश देशपांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!