सांस्कृतीक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणासाठी माधव गव्हाणे यांची निवड

0 105

सेलू/प्रतिनिधी – सांस्कृतीक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र दिल्लीच्या वतीने आयोजित १० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी रायपूर येथील माधव गव्हाणे या शिक्षकाची निवड झाली आहे.
सांस्कृतीक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र ,दिल्ली यांच्या वतीने भारतातील विविध राज्यातील शिक्षकांचे कार्य कौशल्य वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केली जातात. “शिक्षणात हस्तकला कौशल्याचा समावेश आणि उपयोग” (INTEGRATING CRAFT SKILLS IN SCHOOL EDUCATION) या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील रायपूर येथील प्रयोगशील शिक्षक माधव गव्हाणे यांची नुकतीच निवड झाली आहे. उपसंचालक, कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून नुकतेच शिक्षण विभागाला पत्र प्राप्त झाले असून दिनांक 18 जुलै ते 27 जुलै या दरम्यान सदर प्रशिक्षण दिल्ली येथे पार पडणार आहे. माधव गव्हाणे यांच्या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी सुनील पोलास, गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, रामराव बोबडे,रामराव गायकवाड,माणिक पुरी,हनुमान व्हरगुळे, डॉ.शरद ठाकर, प्रा. डॉ राजाराम झोडगे, प्रा. अनंत मोगल, विजय ढाकणे,पुनमचंद खोना, डॉ नयन राठोड,डॉ.काशिनाथ पल्लेवाड सच्चिदानंद डाखोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!