व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमीनाथ जैन यांची निवड

0 11

बोरी / प्रतिनिधी – देशपातळीवर काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बोरी येथील लोकदिलासा या साप्ताहिकाचे संपादक नेमीनाथ जैन यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे,कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पूप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक विंग चे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन जैन यांची निवड केली आहे.

नेमीनाथ जैन हे गत तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून , जिंतूर प्रेस क्लबचे कार्यकारिणी सदस्य व बोरी प्रेस क्लबचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.

 

या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आहेत. साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकिय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्विकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक- पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, म्हाडाच्या घरकूल योजनेच्या आरक्षणामध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळणे, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमधून साप्ताहिकाच्या संपादकांना निधी मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवणे, आदी प्रश्न सोडविण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याची प्रतिक्रिया नेमीनाथ जैन यांनी दिली आहे.

 

जैन यांच्या निवडीचे व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कैलास चव्हाण, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा, परभणी जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील साप्ताहिकांच्या संपादकांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!