परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सेलूत ब्राम्हण समाजाची मागणी
सेलू / नारायण पाटील – राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ब्राम्हण समाजाला न्याय दयावा अशी मागणी भगवान परशुराम जन्मोत्सव समिती व सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे .याबाबत चे निवेदन उपजिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे .
वरील मागणी साठी समाज बांधव रामराव दिनकरराव जोशी व अनंत देवीदासराव जोशी हे आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत .त्याला सर्व समाजाचा पाठींबा असून याबाबत शासकीय यंत्रणेने त्वरित दखल घ्यावी .व परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून त्यांचे उपोषण सोडवावे व ब्राम्हण समाजाला न्याय द्यावा .
समाजातील विद्यार्थ्यांना बालवर्ग ते पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे .बार्टी सारखी स्वतंत्र स्वायत्त संस्था कार्यन्वित करावी . उच शिक्षणासाठी वसतिगृह निर्माण करावेत .मोफत शैक्षणिक साहित्य पुरवण्यात यावेत .
लघु व मध्यम उद्योगांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात यावे .आदी मागण्यांचा देखील निवेदनात समावेश आहे .
यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर चंद्रशेखर मुळावेकर ,ह भ प योगेश महाराज साळेगावकर ,बंडू देवधर ,योगेश कुलकर्णी ,मयूर कुलकर्णी ,मनोज दीक्षित ,श्रीराम भाले ,डॉ अमित कुलकर्णी ,ललित बोबडे ,सौरभ देशपांडे ,निशिकांत पाटील ,रवी कुलकर्णी ,आकाश दायमा ,सचिन सावंगीकर ,किरण दिग्रसकर ,भूषण दिग्रसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती .उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने कृष्णा देशमुख यांनी निवेदन स्वीकारले