बी.रघुनाथ महाविद्यालयात महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अधिवेशन

0 50

परभणी/प्रतिनिधी
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे येथे 39 वे अधिवेशन 28, 29 व 30 डिसेंबर या कालावधीत परभणी येथे बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून राजकीय विचारवंत तथा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक चौसाळकर हे असणार आहेत. ‘संतांचे धर्मचिंतन’ ही या तीन दिवशीय अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्यावर सखोल चिंतन आणि वैचारिक मंथन होईल. त्याचबरोबर या कालावधीत ’सद्यस्थितीत धर्माचे स्वरूप आणि वास्तव’ व ’लोकशाही समोरील आव्हाने आणि उपाय’ हे दोन प्रमुख परिसंवाद होत आहेत. या परिसंवादात राष्ट्रीय पातळीवरील विचारवंत, अभ्यासक, संशोधक आपले विचार मांडणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर), डॉ. प्रदीप खरे (इंदुर) हे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात डॉ. अमित वाल्मिकी (मुंबई), डॉ. प्रदीप गोखले (पुणे), डॉ. सुर्यकांत घुगरे (बार्शी) डॉ. प्रकाश पवार (कोल्हापूर), डॉ. ऋषिकेश कांबळे (छत्रपती संभाजीनगर) डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) डॉ. विजयश्रीनाथ कंची (जळगाव) डॉ. निशिकांत भालेराव (नाशिक), डॉ. दिगंबर नेटके (परीक्षा नियंत्रक- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. तसेच महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदने विद्यार्थ्यांसाठी 1) मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान 2) संत जनाबाईचे तत्त्वज्ञान 3) निरोगी आयुष्यासाठी योग साधना, या विषयावर खुली निबंध सादरीकरण स्पर्धा आणि ‘समाज माध्यमांचा मानवी जीवनावरील परिणाम ’या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून परभणीकर आणि महाराष्ट्रातील तत्वज्ञानप्रेमी, तत्त्वचिंतक, विचारवंत यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. तरी विचारवंत, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी होऊन ’संतांचे धर्मचिंतन’ या विषयाला अनुसरून संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर करावेत. या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी अधिवेशनाचे स्थानिक सचिव डॉ. ग्यानदेव उपाडे यांच्याशी संपर्क साधावा.
या अधिवेशनात महाराष्ट्रातील आणि स्थानिक परिसरातील विचारवंत, तत्त्वज्ञान प्रेमी, समाजसेवक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक सोनी, सचिव ओमप्रकाश डागा, कोषाध्यक्ष डॉ. किशोर मंत्री, सहसचिव अनिल हराळ व पदाधिकारी तसेच बी. रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, मतपचे अध्यक्ष डॉ. सुनील गवरे व कार्याध्यक्ष डॉ. अमन बगाडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!