बोढार हवेली येथील युवकाच्या खुनाचा सेलूत तीव्र निषेध
सेलू ( प्रतिनिधी )दि ३
बोढार हवेली जि नांदेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढल्यामुळे अक्षय भालेराव यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे त्याचा निषेध करून सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून जातीयवादी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी व शासनाने मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करणारे निवेदन सेलू उपजिल्हाधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांना देण्यात आले याप्रसंगी परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत,गौतम साळवे,अशोक पाईकराव,अनिल डंबाळे, सिद्धार्थ सिरसाट,शिवाजी पांडागळे,दिलीप आकात,बुद्धभूषण ढगे, कुणाल सोनटक्के,राहूल लोखंडे आदी उपस्थित होते..आज शासकीय सुट्टीचा दिवस असूनही आंबेडकरी जनतेच्या तिव्र भावना पाहून उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी कार्यालयात येऊन निवेदन स्वीकारले .