शाळा बंद असल्याने विद्यार्थी नाराज तर पालकांत संताप
आनंद बलखंडे
आ बाळापूर,दि 08 ः कोरोनाच्या संकटाने गेली 3वर्षा पासून शाळा बंद आणि सुरुअसा पाठशिवणीचा खेळ चालू ठेवलाआहे.या मुळे विद्यार्थ्यांच भविष्य अंधःकार मय झाल असून मुलांना अभ्यासक्रमाचा विसर पडत आहे. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पुरता बोजवारा उडाला आहे . रेंजची समस्या ,चार्जिंग संपली,रिचार्ज नाही ,गुरुजींचा फोन नॉट रीचेबल असे एक ना अनेक कारनाणी विद्यार्थी व पालक परेशान आहेत . शासन मात्र कोरोना चा बाऊ करत विविध फतवे जाहीर करत आहेत , आणि शिक्षक कर्मचारी नाईलाजाने तो आमलात आणत आहेत . कोरोनाच्या संकटाची भीती पालक व विद्यार्थी शिक्षक याना आहेच ! पण त्या मुळे शाळा बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही असे पालक आता उघड चर्चा करत आहे . दुसरीकडे 9वि12वि चे वर्ग सुरू आहेत ,पण 1त 8 या वर्गाच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या मध्ये आखाडा बाळापूर येथील जि. प.कन्या शाळा , जि.प.प्रशाला तसेच ज्या ग्रामपंचायत लोकसंख्येने मोठया आहेत तेथिल शाळा बंद आहेत ,जसे की हायत्नगर, डोंगरकडा, जवळा बाजार , शिरड शहापूर , या शाळा बाबतीत मा. जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी पत्र काढले आहेत व ह्या शाळा बंद आहेत.मात्र ग्रामीण भागातील खेडेगावात १ली ते ७वि च्या प्राथमिक शाळा बिनदिक्कत पणे सुरू आहेत ,शिवाय इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत , मग जास्त लोकसंख्या असलेल्या गावातच हा नियम का? गर्दी होऊन कोरोना ग्रामीण भागात होणार नाही का ? एकीकडे न्याय आणि दुसरीकडे अन्याय का? मोठया प्रमाणात लोकसंख्या असलेल्या गावातील विध्यार्थ्यां चे शैक्षणिक नुकसान होत नाही का ? बालकांचे लसीकरण झाले नाही मग ग्रामीण भागात शाळा सुरू का? अशी संतापजनक चर्चा पालकांन मध्ये होत आहे आम्ही आमच्या लेकरांची काळजी घेउत व कोरोनाच्या नियमांची ही अमलबजावणी करू पण शाळा सुरू करून आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवा अशी मागणी पालक वर्गा तुन होत आहे