विद्यार्थ्यी रमले कथा लेखन कार्यशाळेत

शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

0 30

 

 

सेलू / नारायण पाटील – येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिना निमित्त अक्षर व्याख्यानमालेअंतर्गत जिल्हास्तरीय कथा लेखन कार्यशाळा नूतन विद्यालयाच्या (कै.) रा. ब. गिल्डा सभागृहात मंगळवार (दि. १७) रोजी संपन्न झाली. कथा लेखन कार्यशाळेस साहित्यिक तथा शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील सेवा निवृत्त अधिकारी नामदेव माळी यांनी मार्गदर्शन केले. 

 

 

याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण सोळंके, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, केंद्र प्रमुख विजय चिकटे, रमेश मरेवाड यांची उपस्थिती होती. या कथा लेखन कार्यशाळेत जिल्ह्यातील ५५ विद्यार्थी व कवी मारूती डोईफोडे, माधव गव्हाणे, किर्ती राऊत, सुमिता सबनीस, संध्या फुलपगार, सुरेखा आहेरकर यांच्यासह दहा शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कथा लेखन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कथा कशी लिहावी. कथेतील पात्र, प्रसंग लेखनाचे तंत्र याचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेत उत्तम कथा लिहिलेल्या कृष्णा जोशी, आदिती मोगल, वैष्णवी मोगरे, मानसी दलाल, ज्ञानेश्वरी रासवे, अनया ढाकणे या विद्यार्थ्यांचे नामदेव माळी यांनी कौतुक केले. जिल्हास्तरीय कथा लेखन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सुरेश हिवाळे, शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!