मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून नियुक्त्या मिळणार

0 139

: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास वर्गातून म्हणजचे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT नं रोखलेल्या पदांची भरता आता करता येईल. यामुळे 408 उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिलाय. जवळपास 2019 पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत.

एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे न्यायालायात प्रलिंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलीये. परंतु  हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या EWS मधून करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएसच्या 2020 पासूनच्या नियुक्त्या या रखडल्या होत्या. या परीक्षेमध्ये निवड होऊन अनेक महिने उलटले तरीही विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा देखील पवित्रा घेतला होता. EWS प्रकरण न्यायालयात निलंबित होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांना देखील ब्रेक लागला होता. पण आता या नियुक्त्या होणार आहेत. त्यामुळे या नियुक्त्या कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

EWS आरक्षण नेमकं काय?

एसटी, एसटी हे जात वर्ग आहेत.  तर, EWS आरक्षण हे खुले आरक्षण आहे. जातीसाठी हे आरक्षण नाही. सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. पण जर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी हे कुणबी प्रमाणपत्र घेतलं तर त्यांना EWS मधून आरक्षण घेता येणार नाहीत.

error: Content is protected !!