विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला
: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या (vidhanparishad) 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने ८ मे रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यानुसार चार जागांसाठी १० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार होता. पण यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केली होती तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली होती
आता या चारही मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नव्या कार्यक्रमानुसार आयोगाकडून ३१ मे रोजी नोटिशिकेशन जारी केले जाईल आणि याच दिवसापासून अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल करण्याची अखरेची तारीख ७ जून असेल १० जूनला अर्जांची छाननी होतील, अर्ज माघारी घेण्याची तारीख १२ जून असेल तर २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असणार आहे. मतमोजणी १ जुलै रोजी होईल. ही सर्व प्रक्रिया ५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल असे आयोगने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.