गंगाखेडमध्ये भाजपाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष? अटीतटीची लढत होण्याची शक्यता
गंगाखेड / रामप्रसाद ओझा – रासपने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी रासपामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपातील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत. परंतु भाजपाचे वरिष्ठ नेर्तृत्व काय निर्णय घेतात याकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपा शिवसेना युती सरकारच्या पुर्वीपासुन भाजपाच्या वाट्याला आलेला आहे. 80,90च्या दशकांपासून जनसंघ मार्फत येथे स्व रामप्रसाद सारडा, नंदकुमार तुपकर, भगवानदास मुंदडा, शामसुंदर मुंडे, माऊली गोंडगावे, दादा हरी काळे, अभय चाटे सह अॅड. व्यंकटराव तांदळे, श्रीराम मुंडे, भाई ज्ञानोबा मुंडे, राम फड ह्या जेष्ठ मंडळी यांच्या साथीने ओमप्रकाशजी चंदेल, रामप्रभु मुंढे लक्ष्मण मुंडे, राम फड खादगावकर, बालाजी मुंडे सह शेकडो जणांनी स्व गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा वाढवली, जोडली, रुजवली. मात्र विधानसभा निवडणुकीत वेळोवेळी मागे सारली. स्व विठ्ठल पुरभाजी गायकवाड वगळता इतर वेळी स्थानिक स्वराज्य संस्था वगळता शिवसेनेचे धाकटे भाऊच राहीली. नंतर ईतर पाथरी जिंतूर मतदारसंघात प्रतिनिधित्व केले पण गंगाखेडला अयशस्वी ठरले. भाजपानेच सिताराम घनदाट यांना थेट मुंबई येथुन आणत उमेदवारी दिली. पण यश पक्षाच्या पदरी पडले नाही. पण सिताराम घनदाट यांनी मतदारसंघात संपर्क ठेवून निवडणुकीत शिवसेनेची छुपी/उघड मदत घेऊन तिनवेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. नंतर मात्र गोपीनाथ मुंडे यांचे जावई डॉ मधुसूदन केंद्रे यांचा थेट नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड होत राजकारणात प्रवेश होत प्रस्थापित झाले. विधानसभा राखीव मतदारसंघ असल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष पदासाठी राजकारण होत गट तट पडले. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व आमदारकी मिळवली पण कार्यकर्ते आहेत पण सक्षम उमेदवार अभावी मतदार संघाचे नेतृत्व भाजपाकडून मित्र पक्षाचे आले. परिणामी आजपर्यंत भाजपाचे उमेदवार कोण? हा प्रश्न कायमचा तसाच राहिला आहे.
विद्यमान आमदार रासपाचे रत्नाकर गुट्टे हे रासपातुन उमेदवारी अर्ज दाखल केला. रासपाने स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले व आज भाजपाला उमेदवार कोण द्यावा हा संभ्रम निर्माण झाला. सध्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व प्रितम मुंढे यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात सुरू असली तरी परिस्थिती गुलदस्त्यात आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भाजपा रत्नाकर गुट्टे यांचा प्रचार करेल असं वक्तव्य केले होते. पण परिस्थिती काही वेगळी आहे. पुढील दोन दिवस शिल्लक असताना कांहीतरी मार्ग निघेल व तो काय असेल हि उत्सुकता मतदारांसह जिल्ह्यातील महायुती समर्थकांना आहे. सध्यातरी रासपाचे रत्नाकर गुट्टे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विशाल कदम, वंचित बहुजन आघाडीकडुन मा.आ. सिताराम घनदाट यांच्यात तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.