मनपाच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारणार – महापौर जयश्री पावडे
नांदेड, गजानन जोशी – महानगरपालिकेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक आणि जबाबदार यंत्रणेने काम करावे यासाठी आपणही पुढाकार घेऊ असे मत महापौर जयश्री निलेश पावडे यांनी व्यक्त केले
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड शाळेच्या शिक्षकांसाठी कोविड -१९ नंतरचे शिक्षण नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिकवण्यातील नवीन आव्हाने ऑनलाईन शिक्षण इत्यादी विषयावर आज महापौर मनपा नांदेड सौ जयश्रीताई निलेश पावडे यांच्या संकल्पनेतून व आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती महापौर सौ जयश्रीताई पावडे, महिला व बालकल्याण व शिक्षण समिती सभापती सौ संगिता डक पाटील,उप सभापती सौ गितांजली कापुरे , समिती सदस्या सौ सरिता बिरकले, सौ जोत्सना गोडबोले, सौ कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यशाळेस प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणुन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेडचे जिल्हा समुपदेशक बालाजी कच्छवे व आदित्य् कच्छवे उपस्थित होते.
सकाळी १० ते ४ या वेळेत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा अंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी महापौर सौ जयश्रीताई पावडे यांनी मनपा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी व शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. शिक्षक, मुख्याध्यापक व शाळेतील मूलभूत अडचणी सांगितल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न केले जातील असं मतही महापौर सौ जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केलं. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.