व्हॉट्सअपचे नवीन फीचर्स,’या’ मिळतील सुवीधा

0 152

 व्हॉट्सअप (WhatsApp Features) आता आणखी सोयी-सुविधांसह येत आहे. हा एक मंच म्हणून समोर येत आहे. यावर तुम्हाला पेमेंट्स करता येते. मॅसेज करता येतो. व्हिडीओ-ऑडिओ कॉल करता येतो. ग्रुप तयार करता येतो. आता व्हॉट्सअप चॅनल्सच्या माध्यमातून सेलेब्रिटी आणि इतर अपडेट मिळवता येत आहे. पण हा पेटारा इथंच थांबलाय असे नाही. सुविधांचा पाऊस युझर्सवर होणार आहे. त्यांच्यासाठी व्हॉट्सअप अजून नवीन फीचर्स जोडत आहे. व्हॉट्सअप चॅनलनंतर (WhatsApp Channels) आता नवीन फीचर्सचा भडीमार होणार आहे. कोणते आहेत हे नवीन फीचर्स, युझर्सला काही होईल त्याचा फायदा. एकाच प्लॅटफॉर्मवर युझर्सच्या मुठीत अवघं जग सामावणार आहे.

  1. WhatsApp Flows : हे खास फीचर जोडल्या जाणार आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअप चाळता चाळता जेवणाची ऑर्डर देऊ शकता. सीट बुक करु शकता. अपॉईंटमेंट बुकिंग करु शकता. हे फीचर पुढील आठवड्यात रोलआऊट होत आहे. केवळ हे एकच फीचर नाही तर इतर पण अनेक सोयीसुविधा युझर्सला मिळतील. काही फीचर्स केवळ इन्स्टाग्राम आणि फेसबूक युझर्सलाच मिळत होते. पण आता हे फीचर्स व्हॉट्सअप वापरकर्त्यांना पण मिळणार आहे. लवकरच हे फीचर्स तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअपमध्ये दिसतील.
  2. Meta Verified : हे खास फीचर लवकरच भात्यात जोडल्या जाईल. हे व्हॉट्सअपच्या बिझनेस खात्यात दिसेल. लवकरच हे फीचर रोलआऊट करण्यात येणार आहे. मेटाने हे फीचर सर्वात आधी इन्स्टाग्राम आणि फेसबूकसाठी सुरु केले होते. आता हे फीचर व्हॉट्सअप बिझनेससाठी सुरु करण्यात येणार आहे. हे फीचर दिमतीला आल्याने वापरकर्त्यांना प्रीमियम फीचर्स मिळतील. लागलीच बिझनेस अकाऊंटला हे फीचर येणार नाही. त्यासाठी अगोदर छोट्या बिझनेस अकाऊंटवर त्याची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी हे फीचर उपलब्ध असेल.
  3. Payment Options : फ्लो आणि मेटा व्हेरिफाईड शिवाय 500 दशलक्ष हून अधिक वापरकर्त्यांसाठी नवीन पेमेंट सुविधांचा पर्याय समोर येईल. युझर्स कार्टमध्ये उत्पादनं दिसतील. युपीआय, डेबिट, क्रेडिट कार्ड यावरुन तुम्हाला बिल पेमेंट करता येईल.व्हॉटसॲप वापरकर्त्यांसाठी ‘कॉल बॅक’चा पर्याय लवकरच आणेल. वापरकर्त्यांना मिस्ड व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी कॉल बॅक पर्याय लवकरच उपलब्ध होईल. मिस्ड कॉल डिटेल्स लागलीच युझर्सला कळतील. यासंबंधी पॉपअप येईल. वापरकर्त्याला कॉलबॅक करता येईल. या नवीन फीचरसाठी व्हॉटसॲप अपडेट करण्यात येईल
error: Content is protected !!